वसई महानगरपालिकेत विविध पदांची भरती! तरुणांना नोकरीची चांगली संधी

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विधि पॅनलवर वकिलांची तीन वर्षांकरिता नव्याने नेमणूक करण्याबाबत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयीन कामकाज करण्याकरिता खालीलप्रमाणे मा. न्यायालय/न्यायाधिकरण निहाय विधि तज्ज्ञांची महानगरपालिकेच्या विधि पॅनलवर तीन वर्षांकरिता नव्याने नेमणूक करावयाची आहे:

त्या दूरीने इच्छुक तकीत वकील संस्था यांच्याकडून वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय इमारत, विधि विभाग, ६ वा मजला, यशवंतनगर, महाडा संकुलाजवळ, विरार पश्चिम, ता. वसई, वि. पालघर, पिन कोड ४०१३०३ येथे दिनांक २८.०२.२०२५, सायं. ०४.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता) विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण तपशील व कागदपत्रांसहित मागविण्यात येत आहेत. विलंबाने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची कृपया नोंद घेण्यात यावी,

महानगरपालिकेच्या वतीने करावयाचे न्यायालयीन कामकाजासाठी ठरविलेले दर, अटी-शर्ती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या http://vvcmc.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

इच्छुक वकील वकील संस्था यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सदर दरसूची, अटी-शतीं व अर्जाचा नमुना यांची प्रिंटआऊट काढून सदर अर्ज, दरसूची व अटी-शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.

वकिलांच्या पॅनलच्या नियुक्तीबाबत मा. आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील.

एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय इमारत, विधी विभाग, सहावा मजला, यशवंतनगर, म्हाडा कॉम्प्लेक्स जवळ, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर, पिन कोड- 401303.

 

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा