बापरे! भर दिवसा ट्रेनमध्ये तरुणीच्या बाजूला बसून अश्लिल स्पर्श; तरुणीनं VIDEO काढला नसता तर कोणाचा विश्वास बसला नसता Train Bad touch Viral Vide

Train Bad touch Viral Vide:सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे या सोशल मीडियामुळे अनेक गुन्ह्यांचे खुलासे होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देश कितीही पुढे गेला तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्या सुधारत नाही.

महिलांना लोकल ट्रेनमधील गर्दीत, कधी ऑफिसमध्ये तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर मिळतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही विकृत लोक महिलांची छेड काढतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीनं भरदिवसा ट्रेनच्या गर्दीमध्ये तरुणीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तरुणीनं व्हिडीओ काढला नसता तर कोणाचा विश्वास बसला नसता.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना केरळ ट्रेनमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणची सुरक्षितता आणि सामाजिक वर्तन याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीच्या बाजूला बसलेला व्यक्ती तिला वारंवार चुकीचा स्पर्श करत आहे. यावेळी तिनं व्हिडीओ काढला आणि या व्यक्तीचा सर्व कारनामा या व्हिडीओमध्ये कैद झाला. तो वारंवार तरुणीच्या छातीला स्पर्श करताना दिसत आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्या घृणास्पद कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.