Thane MahanagarPalika Bharti 2025:दोन वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील १,७७० कर्मचारी पदांची मेगाभरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.
त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे, तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तिपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. पदभरती एक हजार ७७० असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे
पालिकेत कार्यकारी अभियंत्यांची
पाच पदे, उपनगर अभियंत्यांची सात पदे, कनिष्ठ अभियंत्यांची (नागरी) ७७ आणि कनिष्ट अभियंत्यांची ६६ अशी १६५ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत ६८ पदे भरली गेली आहेत; मात्र ३८२ रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्यात १८० फायरमन कायमस्वरुपी घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आरोग्य विभागात २५० परिचारिका, सुमारे ८०० वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. या विभागात सर्वाधिक पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे; मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.