State Employees Shasan Nirnay:1)शासन निर्णय:महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतनाचे दायित्व शासनाने दिनांक २३.३.२०१७ च्या शासन निर्णयान्वये स्विकारले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनावरील खर्च अदा करण्यासाठी अनुदान म्हणून २२१५६०५२ या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष सन २०२५-२६ करिता रु.३५८.६२९५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. सदर लेखाशिर्षांतर्गत वित्त विभागाने उपलब्ध केलेला निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास वितरीत करण्याची बाब विचाराधीन आहे.
शासन निर्णय डाऊनलोड येथे क्लिक करा
02.वेतन अनुदान : शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 05.08.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण , सर्वसाधारण शिक्षण , जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम इ. लेखाशिर्ष अंतर्गत निधींचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे . GR डाऊनलोड करण्यासाठी
शासन निर्णय डाऊनलोड करा
3)शासन निर्णय:शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळसेवेने, पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणूका / पदस्थापना करताना संबंधीत प्रकरणे कोणत्या स्तरापर्यंत सादर करावी व कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावे, याबाबत विशिष्ट आदेश नाही. सर्वसाधारणतः नियुक्ती प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाते. मात्र असे नियुक्ती प्राधिकारी कोण असतील याबाबत संदर्भाधिन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक १९/११/२०१६ द्वारे मार्गदर्शक सूचना/ निर्देश निर्गमित करण्यात आले आहे. सदर सूचना/निर्देश विचारात घेऊन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय डाऊनलोड करा