Regarding implementing the Adishakti Campaign and awarding the Adishakti Award… GR:राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी”आदिशक्ती अभियान” राबविणे व”आदिशक्ती पुरस्कार” प्रदान करणेबाबत
महाराष्ट्र हे राज्यातील गरजु नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविणारे पुरोगामी राज्य आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६०% महिला व बालके आहेत, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये महिलाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहचविणे हा प्रमुख उद्देश ठेवून तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे व जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे, अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे तसेच महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष अभियान राबविण्याची व आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,
शासन निर्णय –
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील. महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना/उपक्रम/कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी देऊन जनमाणसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाती ग्रामस्तरीय समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देऊन गौरविण्यात येईल.
२. आदिशक्ती अभियानाचा उद्देश व अभियानाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येईल:-
१) उद्देश:
१) ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे.
२) कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता सक्षम समाज निर्माण करणे.
३) लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व
बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे,
४) लैंगिक, शारीरिक अत्याचार ला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रुढींचे निर्मूलन करणे,
५) महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे.
६) महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क ग्रामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्या माध्यमातून आर्थिक उन्नत श्री संकल्पना राबविणे.
२) अभियानाची कार्यप्रणाली :-
राज्यात सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर विशेष समित्यांचे मठण करण्यात येईल, सदरच्या समित्या खालीलप्रमाणे असतील
ग्रामस्तर समिती :-
१) ग्राम सभेने निवडलेली महिला प्रतिनिधी
अध्यक्ष
२) पुरुष प्रतिनिधी (महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय)
सदस्य
३) पुरुष प्रतिनिधी (सामाजिक क्षेत्रात सक्रिय)
सदस्य
४) आशा स्वयंसेविका
सदस्य
५ महिला शिक्षिका महिला तलाठी/महिला पोलीस पाटील
सदस्य
६) ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
सदस्य
a) पोलीस पाटील
सदस्य
८) अंगणवाडी सेविका
सदस्य सचिव
समिती अध्यक्ष / अशासकीय सदस्य निवडीचे निकष :-
१. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसमा घेऊन ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी.
२. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये किमान ३ वर्षे उत्कृष्ट उल्लेखनिय कार्य केलेली महिला असावी.
३. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशिलता असावी.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
४. बाल विवाह प्रतिबंध, बाल मजूरी प्रतिबंध, हुडा निर्मुलन, कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध, बालकांचे व महिलांचे लैंगिक, आर्थिक, मानसिक, शारिरीक शोषण प्रतिबंध, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणान्या लैंगिक छळास प्रतिबंध, अनैतिक व्यापार प्रतिबंध, आरोग्य व वैद्यकिय सुविधा, शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक सक्षमता या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झालेली महिला असावी.
५. महिलेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा.
६. ग्रामस्तरीय समितीमध्ये दोन सदस्य महिला दूत / ग्राम दूत म्हणून काम करतील, समितीची सदस्य सचिव एक महिला दूत असेल व दोन पुरुष सदस्यांपैकी एका पुरुष सदस्याची निवड ग्राम दूत म्हणून करावी. ग्रामस्तर समिती अध्यक्षांना महिला दूताची जबाबदारी देण्यात येऊ नये.
७. महिलादूत / ग्रामदूत तसेच ग्राम स्तर समितीच्या उर्वरीत सदस्यांना अभियान राबविण्याचे प्रशिक्षण महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरून देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी आवश्यक ती प्रशिक्षण पुस्तिका (Training Module) महिला व बाल विकास आयुक्तालयाने तयार करावी.