गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणात सुधारणा बाबत; शासन निर्णय निर्गमित | Regarding amendment in intra-district transfer policy of Group C and D cadre employees; Government decision issued

Regarding amendment in intra-district transfer policy of Group C and D cadre employees; Government decision issued:गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणात सुधारणा बाबत; शासन निर्णय निर्गमित:

नमस्कार राज्यातील कर्मचारी बांधवांसाठी जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात दिनांक 23 मे 2019 रोजी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून याबाबत आज आपण या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.

जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम

विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.

सदर शासन निर्णयातील “प्रकरण-२, जिल्हास्तरीय बदल्या मधील अ.क्र.३ येथील तक्त्यामधील अ) प्रशासकीय बदली (१) व (२) येथील खालील मजकुर वगळण्यात येत आहे.-

शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी! शेतरस्ता आणि सातबारा उतारा संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित Important government decision issued regarding Shettarasta and Satbara Utara

बदलीचा प्रकार

अ) प्रशासकीय बदली

१) गट-क संवर्गातील कर्मचारी (प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी वगळून (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)

२) प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात)

टक्केवारी

$१०% अनिवार्य

$१०% अनिवार्य

$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.

$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.

व त्याऐवजी खालील मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.

बदलीचा प्रकार

टक्केवारी

अ) प्रशासकीय बदली

$१०% अनिवार्य

१) गट-क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी (प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून) (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)

$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.

$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५२३१७३४२१५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,