मोठी बातमी आयकर भरणारे अन् चारचाकी असणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणारRation Card Update

Ration Card Update:राज्याच्या पुरवठा विभागाच्याआदेशानंतर सोलापुरातील आयकर भरणारे, तसेच ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या असून, ते स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी आहेत.

अशांची माहिती संकलित करून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची सूचना पुरवठा विभागाने केली आहे. सध्या सोलापूर पुरवठा विभागाने तहसीलदारांना पत्र पाठवून लाभार्थी कार्डधारकांची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

१७ जुलै रोजी तसे आदेश काढले. अद्याप माहिती न मिळाल्याने शोधमोहीमसाठी पुरवठा विभाग जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना स्मरणपत्र पाठवणार आहे.

मागील सहा महिन्यांपासून ज्यांनी धान्य घेतलेले नाही, अशांचीही यादी तयार होत आहे.

बँक ऑफ इंडिया 5 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज असा कराBank of India Personal Loan

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी

अंत्योदय: ६० हजार ४२२ कार्ड

एकूण लाभार्थी सदस्य :२ लाख ८० हजार ४४६

अन्नसुरक्षा : ४ लाख ६१ हजार २५

एकूण लाभार्थी सदस्य ः २१ लाख ९५ हजार ८६७

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक

Ladki bahin: खुशखबर! महिलांच्या खात्यात येणार थेट 3000 रुपये – तुमचं नाव यादीत आहे का? Ladki Bahin Yojana Insttalment

शहर विभाग

अंत्योदय: ६ हजार १४५

एकूण लाभार्थी: २४ हजार ६९०

अन्नसुरक्षा: १ लाख ९ हजार ८०४

एकूण लाभार्थी : ४ लाख ९४ हजार ७१३ सोलापूर ग्रामीण

अंत्योदय

एकूण लाभार्थी: २ लाख ५५ हजार ७५६

अन्नसुरक्षा : ३ लाख ५१ हजार २२१ कार्ड

एकूण लाभार्थी : १७ लाख १ हजार १५४

१ धान्य न घेणाऱ्या लाभार्थीचे कार्ड रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे. वारंवार सांगून ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही, अशांचे कार्ड रद्द होणार आहे

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आयकर व चारचाकी वाहन चालक लाभार्थीची माहिती संकलन करण्याची सूचना करण्यात आली आहे. अद्याप माहिती आलेली नाही. तहसीलदारांकडून माहिती आल्यानंतर पुढील कार्यवाही करू,संतोष सरडे

जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर

पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेले धान्य वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने एकूण लाभार्थी आणि त्यातील गरजू लाभार्थी यांची आता वर्गवारी होणार आहे.

मोठी बातमी ऑगस्ट महिन्यात ” हे” 05 दिवस शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये व बँकांना असणार सुट्टी !Public school Holiday Announcement