Police Recruitment 2025:महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत..
राज्य शुद्धिपत्रक :-
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी एकूण १५,६३१ पदे भरतीसाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४
“४. सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”
या ऐवजी
“४. सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
असा वाचण्यात यावा.