राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025 New Cast List 2025

New Cast List 2025:महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक-१. दि.२६ सप्टेंबर २००८ च्या शासन पत्रान्वये प्रसिद्ध केली आहे.

२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जाती जमाती संदर्भातील नियमन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात येते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र देणाऱ्या व त्यांची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांना तसेच मागासवर्गीयांचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी एकत्रित संकलन स्वरूपाची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३ सदर यादी ही संकलन स्वरूपाची असून, मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गाचे लाभ लागू करताना, सदर जाती जमातींचा ज्या शासन निर्णय वा आदेशान्वये समावेश केलेला आहे ते शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावेत.

४ सदरहू शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्याचा संकेताक २०२५०१०९११२९०५५६३४ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा