Nepal Gen Z Protest Mob Finance Minister Video: नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांच्यावर जेन झेड आंदोलक हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी आंदोलकांनी पौडेल यांचा रस्त्यावर पाठलाग करत त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काठमांडूच्या रस्त्यांवर अनेक लोक पौडेल यांच्या मागे धावत असल्याचे दिसून येते आणि यादरम्यान एक आंदोलक त्यांना ढकलतो यानंतर ते भिंतीवर आदळल्याचे दिसत आहे. यानंतर पौडेल यांनी उठून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलनकांनी पुन्हा त्यांचा पाठलाग सुरू केला.
नेपाळ आणि राजधानी काठमांडूसह इतर अनेक शहरांमध्ये हजारो आंदोलक सुरक्षा दलांशी संघर्ष करत आहेत. संपूर्ण देशभरात हिंसक संघर्ष सुरू आहेत. परिस्थिती बिकट होत असताना नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान जेन झेड तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे आणि २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान आंदोलक सरकारविरुद्ध इतके संतप्त आहेत की, त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घरांना आग लावली आहे. आंदोकांनी संसद आणि राष्ट्रपती भवनातही घुसून तेथे आग लावली. हिंसक आंदोलन नियंत्रित करण्यात पोलीस आणि सुरक्षा संस्था अपयशी ठरत आहेत.
आई योजना २०२५ : महिलांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज येथे ऑनलाईन अर्ज करा.Aai Loan Scheme
नेपाळमध्ये सरकारविरोधी आंदोलनामुळे विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एअर इंडियाने आज (९ सप्टेंबर २०२५) दिल्लीहून काठमांडूला जाणारी आपली उड्डाणे रद्द केली आहेत. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी आंदोलन होत आहे आणि काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त, इंडिगोनेही सुरक्षेच्या कारणास्तव काठमांडूला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत
भारत शेजारील नेपाळमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, नेपाळमध्ये आंदोलनात अनेक तरुणांच्या मृत्यूमुळे भारताला खूप दुःख झाले आहे आणि आशा आहे की हे प्रश्न शांततेने सोडवले जातील. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही कालपासून नेपाळमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि इतक्या तरुणांच्या जीवितहानीमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे.”