महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त पदांची भरती जाहीर, MSF Recruitment 2025

MSF Recruitment 2025:महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation – MSSC) मार्फत सहसंचालक (Joint Director) आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी (Security Supervisory Officer) या पदांसाठी एकूण ३० रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया २३ मे २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ६ जून २०२५ सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण पदसंख्या: ३०

पदाचे नाव

सहसंचालक (Joint Director)

सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी (Security Supervisory Officer)

शैक्षणिक पात्रता

पदवीधर असणे आवश्यक असून उमेदवार निवृत्त अधिकारी असावा.

वयोमर्यादा

कमाल वयोमर्यादा ६१ वर्षे.

निवड प्रक्रिया

निवड केवळ मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

पगार संरचना

निवृत्त पोलीस निरीक्षक: रु. ४५,०००/-

निवृत्त सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक: रु. ३५,०००/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्य

अर्जाची पद्धत: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक,

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,

केंद्र – १, ३२ वा मजला,

वर्ल्ड ट्रेड सेंटर,

कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

मुलाखतीचे ठिकाण

पत्ता – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: २३ मे २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ जून २०२५

महत्वाचे दुवे

जाहिरात PDF येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा