महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 260 पदाची भरती!

Maharashtra State Electricity Transmission Recruitment:महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे.

त्यापैकी ७ परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणा-या बेलनगट ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवेद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.

वेतनश्रेणी :

२.१ निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

२.२ मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.

३. शैक्षणिक अर्हता व अनुभव (दिनांक ०३.०४.२०२५ पर्यंत):

३.१ निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) या पदांकरिता उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असावा.

शैक्षणिक अर्हत:

१) वाणिज्य शाखेची पदवी (B.Com)

२) एमएससीआयटी परिक्षा

३.२ प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दि. ०३.०४.२०२५ पर्यंत संबंधित शैक्षणीक अर्हता व अनुभव धारण / संपादित केलेला असणे आवश्यक आहे. सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण केलेल्या उमेदवारांनी जरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता मादीमध्ये स्थान मिळविले तरी असे उमेदवार अपात्र ठरतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

४. वयोमर्यादाः

४.१ दि. ०३.०४.२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेकरीता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी.) प्रमाणपत्रावर नोंदविलेली / दर्शविलेली जन्मतारीख ग्राहय धरण्यात येईल.

४.२ शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.

४.३ माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.

४.४ दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील,

४.५ महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.

४.६ वयोमर्यादकरीता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी.) प्रमाणपत्रावर नोंदविलेली / दर्शविलेली जन्मतारीख ग्राहय धरण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा