Mahajyoti Yojana:JEE/NEET/MHT-CET-2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे.
त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रताः-
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
3. सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्याथी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील,
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ
दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.
5. विद्याध्यऱ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
व. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रेः-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र)
5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
6. इयत्ता ।। वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
ड. अर्ज कसा करावा :-
1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for JEE/NEET/MHT-CET-Batch-2025-27 Training यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकोत करून स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन जोडावे.
> अटी व शर्ती :-
1. अर्ज करण्याची अंतिम दि.31/05/2025 आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील,
4. कोणत्याही माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः संपर्क क्र- 0712-2870120/21
अधिकृत परिपत्रक येथे डाऊलोड करा