Ladki Bahin Yojana Insttalment List:आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मधील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता वितरण.
वाचा
प्रस्तावना:-
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे. २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरीत करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्र.३ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता, सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क.टी-५ मधील मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशिर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता (लेखाशिर्ष २२३५ डी७५८) बाब क्र.३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत रु.३३५७०.०० लाख (अक्षरी रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त) इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.
२ नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, आदिवासी उपयोजना बाहा क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरुन शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल,
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.
४ सदर तरतुद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क. १ येथील शासन परिपत्रकांतील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील.
सदर निधीची ज्या प्रयोजनासाची मागणी केली आहे. त्याच प्रयोजनार्थ खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिका-यांची आहे.
५. निधी वितरीत करताना विहीत कार्यपध्दतीचा अवलंब केल्याची खातरजमा करूनच सदरचा सखर्च करण्यात यावा, तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे.
६ सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क. ५५९/२०२५ बाय १४, दि.२०.०५.२०२५
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे,
9. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सकिताक २०२५०५२३१२१०१९६०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक मंत्रालय, मुंबई
३. सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,
अपर आयुका, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपुर.
६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
वित्त विभाग (अर्थसंक१९) मंत्रालय मुंबई
८. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई
९. महालेखापाल (लेखापरिक्षा (लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
कार्य १४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. निवड नस्ती (कार्या-६. आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
लाडकी बहीण लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा