Ladki Bahin Yojana Insttalment Hike:निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेत अद्याप वाढ झालेली नाही. निवडणुकीदरम्यान काही नेत्यांनी या रकमेत वाढ करण्याची आश्वासने दिली होती.
पण जवळपास वर्ष उलटूनही रकमेत वाढ झाली नाही. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत योग्य वेळी वाढ करणार अशी घोषणा केली आहे.
रक्षाबंधनानिमित्त मुलुंडमध्ये आयोजित लाडक्या बहिणींचा
देवाभाऊ या कार्यक्रमात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींसाठी चांगले प्रयत्न करत असताना काही सावत्र भाऊ त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. योजनेविरोधात ते न्यायालयात गेले, पण काही साध्य झाले नाही. म्हणून योजनेत भ्रष्टाचार झाला असा आरोप केला.
योजनेतला निधी सरकारच्या खात्यातून थेट लाभार्थी बहिणींच्या खात्यात जातो. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही. भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे. प्रामाणिक लाभार्थी भगिनींना आम्ही हा लाभ देत राहणार आहोत.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा