Ladki Bahin Yojana Insttalment :महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी खूप उपयोगी ठरत आहे. 2024 साली सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. या पैशांमुळे अनेक महिलांना घरखर्च आणि गरजा पूर्ण करणं सहज शक्य होतं.
आता रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी एक गोड बातमी दिली आहे. या वेळी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत. म्हणजेच त्यांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम 9 ऑगस्ट 2025 रोजी येण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या आधी मिळणारा हा डबल हप्ता महिलांसाठी एक खास गिफ्ट ठरेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनेचे मुख्य अटी काय?
अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
घरातील कुणीही सरकारी नोकरीत नसावा.
अर्ज प्रक्रिया मोफत असून मोबाईल अॅप, वेबसाईट किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन सहज करता येते.
सध्या काही काळ अर्जांची छाननी थांबवण्यात आली आहे, त्यामुळे आधीच अर्ज केलेल्या महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे.
रक्कम वाढण्याची शक्यता!
सरकार योजनेत आणखी सुधारणा करत आहे. लवकरच दरमहा मिळणारी रक्कम 2100 रुपये करण्याचा विचार सुरू आहे. तसेच महिलांसाठी स्वयंसहायता गटांद्वारे रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही अपेक्षित आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण असतो आणि यंदा राज्य सरकारकडून बहिणींना मिळणारा डबल हप्ता त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आणेल.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुमचं बँक खातं तपासा. योजनेची अधिक माहिती आणि नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in
ही योजना म्हणजे महिलांसाठी आर्थिक आधार आणि एक प्रकारे सणाचा गोड आशीर्वादच आहे!