Hingoli Mahavitaran Apprentice Recruitment 2025:अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ करीता प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांच्या NCVT अंतर्गत वीजतंत्री/ तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवाराकडून एक वर्ष कालावधी करीता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीज तंत्री ४० व तारतंत्री ४० अशी एकूण ८० पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी दि. ०१.०४.२०२५ ते दि. ०९.०४.२०२५ (१७.००) वाजेपर्यंत) www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना कोड E०२१७२७०००५७ वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
दि ०१.०४.२०२५ ते दि. ०१.०४.२०२५ (१७.००) वाजेनंतर) प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराची निवड ही आयटीआय एकुण गुणाच्या टक्केवारी (मेरीट) नुसार खालील अटी व शर्तीच्या राहुन करण्यात येईल.
१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री / तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. ऑनलाईन अर्ज सादर करतांना एसएससी गुणपत्रीका व प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रीका (४ सेमीस्टर / वार्षीक) व आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागासप्रवर्गातुन अर्ज केलेल्या उमेदवारांना आवश्यक) रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग ही माहिती अचुक भरण्यात यावी तसेच आवश्यक मुळ प्रमाणपत्र योग्य रितीने सुस्पष्ट दिसतील असे स्कैन करुन उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर अपलोड करावे.
सोचत रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. अपूरे अर्ज किंवा अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व या बाबत कसल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
३. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्राची (शैक्षणिक प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक, सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवाशी दाखला ईत्यादी साक्षाकीत सुस्पष्ट छायाकीत प्रती दि. ०९.०४.२५ (१७.००) वाजेपर्यंत महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करावे.
वरील प्रमाणे नमुद कागदपत्रांच्या साक्षार्कीत छायाकीत प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. ४. वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष, मागासवर्गीयासाठी ५ वर्ष शिथीलक्षम राहोल
५. सदर भरती ही फक्त हिंगोली जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारासाठी असुन इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. ६. उमेदवाराने पोर्टल बर रजिष्ट्रेशन करणे व ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. इतर मार्गने सादर केलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
७. निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
८. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना सद्यस्थितीत चालु असलेला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नमुद करावा. या कार्यालया मार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत अवगत करण्यात येईल.
९. मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी ऑनलाईन प्रणालीत अपलोड केलेल्या कागदपत्रात काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवाराची निवड कुठल्याही टप्यावर रदद करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.
१०. भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणतेही बदल करण्याचे किया संपूर्ण जाहीरात रदद करण्याचे, नमुद पदे कमी जास्त करण्याचे तसेच भरती प्रक्रीयेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनास राहतील.
प्रशिक्षणार्थी एकूण जागा:80
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय (संबंधित अभ्यासक्रम) उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा