माहे मे पेड इन जुन वेतन / पेन्शन देयकासोबत 2% DA वाढ शासन निर्णय निर्गमित DA Hike GR

DA Hike GR:महाराष्ट्र सरकार क्रमांक :-एचसीटी-१११७/प्र.क्र.१०/का.३ विधि व न्याय विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.तारीख :- २८.०५.२०२५.

संचालक, केंद्रीय वित्त व व्यय विभाग, (केंद्र सरकार), नवी दिल्ली यांनी क्र.१/१(१)/२०२५-E.II(B), दि.०२.०४.२०२५ ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

वनविभागात 10वी-12वी पाससाठी 12,991 शिपाई, मदतनीस, सफाईकामगार, रक्षक पदे, वेतन ₹15,000 – ₹47,600 पर्यंत. Maharashtra Forest Recruitment 2025

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.०१.०१.२०२५ पासून लागू करण्यात आलेली २% (५३% ते ५५%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील.

त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.०१.०१.२०२५ पासून ५५% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

तुमच्या शेताचा सातबारा उतारा (7/12) पहा मोबाईलवर; 2 मिनिटांत Land Record Satbara Utara

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०५२८१४५०५७२६१२ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.