Balbharati New Syllabus 2025:शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्याने प्रकाशित करावयाची पाठ्यपुस्तके तसेच पाठ्यस्तकांच्या बदलाबाबत…
संदर्भ : १) परिपत्रक क्रमांक व/ड/६/५९५७ दिनांक २४.०१.२०२४
२) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र. २१६/ एसडी-४ दिनांक २८.०१.२०२५
३) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.९४/एसडी-४ दिनांक १६.०४.२०२५
४) नियामक मंडळ ठराव क्रमांक ५५४९ दिनांक २६.०३.२०२५
संदभर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदभनि झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.
१) संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित (विषवनिहाय) पाठापुस्तके वहह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील.
२) संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून टप्प्या-टप्प्याने खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
अ.क्र.
अंमलबजावणी वर्ष
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७
शैक्षणिक वर्ष २०२७-२०२८
शैक्षणिक वर्ष २०२८-२०२९
इयत्ता
इयत्ता १ ली
इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी
इयत्ता ५ बी, ७ वी, ९ वी व ११ वी
इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी
३) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १ लीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार असून पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके बहह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील. तसेच अनुक्रमांक २ नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याने त्या-त्या शैक्षणिक वर्षानुसार सदर इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
४) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ पीची सर्व नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून दिली जातील.
५) इयत्ता १ लीच्या खेळू करू-शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्तपुस्तिकेची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद, पुणे कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
६) इयत्ता १ लीसाठी “खेल खेल में सिखे हिंदी” (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत सर्व संबंधितांना अलहिदा कळविण्यात येईल.
७) मराठी शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ मराठी या पाठ्यपुस्तकासंदर्भात अलहिदा कळविण्यात येईल.
८) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ (जून २०२५) हे इसत्ता २ री, इयत्ता ३ री, इयत्ता ४ थी व इयत्ता ६ वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
९) इयत्ता २ री ते इयत्ता ८ बीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय, मुल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घेण्यात यावी.
१०) पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांना पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के बटाव देण्यात येतो. तथापि, दिनांक २६.०३.२०२५ पासून फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर अधिकचा ५% बटाव देण्यात येईल. सदर रकमेचे समायोजन हंगाम कालावधी संपल्यानंतर करण्यात येईल.
११) पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांचेकडे इयत्ता ३ री ते ८ वीच्या शिल्लक असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाचत निवेदन प्राप्त झाल्यास विक्री हंगामानंतर सदचा विषय नियामक मंडळाच्या सभेत सादर करण्यात येईल, तद्नंतर घेतलेला निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात येईल.
तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.