वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत,GR निर्गमित दि.28.03.2025 Amendment in the policy of intra-district transfers of Class 3 and 4 cadre employees

Amendment in the policy of intra-district transfers of Class 3 and 4 cadre employees:जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन पूरक अर्जः जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मंत्रालय, मुंबई – ४०० ००१

दिनांक:- २८ मार्च, २०२५

वाचा :-१) शासन निर्णय. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४

२) शासन पूरक पत्र क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४, दि.७.३.२०१९

शासन पूरकः-जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.

सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील कलम ३ (क) येथे “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने (कॅन्सर) आजारी/पक्षघाताने आजारी/डायलेसिस सुरु असेलेले कर्मचारी या अगोदर “४० वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३२८१३१२१४३२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,