राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनऐवजी रोख पैसे, 45 कोटी रुपयांचे वितरण.Ration Card Salary

Ration Card Salary:शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य याअंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम ४५ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राज्यावर संकट! 16 ते 18 सप्टेंबर धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा.Maharashtra Rain Update

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा, शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा १४ जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यात येते.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती Bank Of Maharashtra Job Recruitment 2025

या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जानेवारी, २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या दि. २० जून २०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रक्कमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी १७० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

लाडकी बहीण, ऑगस्ट महिना हप्ता आज पासून पैस जमा होण्यास सुरुवात, चेक करा.Ladki bahin Yojana 14th installment Deposit

शासनाच्या Aepds प्रणालीवरील Key Register नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून ४४ कोटी ४९ लाख ८२ हजार ६५० रुपये एवढा निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदी मधून आहरित करुन PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरीत करण्याकरीता सोबत जोडलेल्या ‘परिशिष्ट अ’ नुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा