राज्यावर संकट! 16 ते 18 सप्टेंबर धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पावसाची हजेरी बघायला मिळाली. शेवटी दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळतंय. मात्र, आता परत एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय.
राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अजून पाऊस गेलेला नाहीये. परत एकदा जोरदार पाऊस राज्यात बघायला मिळेल. यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला आणि जोरदार झाला. हेच नाही तर सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले.
आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर या भागात पावसाचा कहर सुरू आहे. सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अनेक लोक पुरात वाहून गेली.
हमीभाव तेव्हाच मिळणार,जेव्हा शेतकरी ई-पीक पाहणी करणार.New Pik Rates 2025
राज्यात पुढील आठवड्यात परतीचा पाऊस धडकणार
पुढील आठवड्यात परतीचा मॉन्सून धडकणार आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणात कोसळणार असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
राज्यातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो
यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झालीये. पुढील 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान राज्यावर आणि देशावर पावसाचे संकट हे राहणारच आहे. यादरम्यान नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. फक्त पाऊसच नाही तर जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाच्या अगोदर शेती कामे उरकून घेण्यास सुरूवात केलीये.
भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा
राज्यात पावसाची सुरू असलेली उघडझाप यामुळे कमाल तापमानात वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक, पुणे, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर या भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. काही भागात मागे झालेल्या पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाले. कित्येक हेक्टर पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. पावसाचा सर्वाधिक फटका हा यंदा नांदेड जिल्हात बसलाय.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा