लेखी परीक्षेशिवाय भरती! फक्त मुलाखत द्या, बँकेत नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती. Canara Bank Recruitment 2025

Canara Bank Recruitment 2025: जर तुम्ही बँकिंग आणि वित्त क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (CBSL) ने तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. कंपनीने ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) वेळ आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येईल. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा आणि पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि वय 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मोजले जाईल.

मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरलViral video

मुलाखतीची माहिती थेट उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाणार

मुलाखतीची माहिती थेट उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलाखतीसाठी कॉल येणे ही अंतिम निवडीची हमी नाही. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि पात्रता तपासणी देखील करावी लागेल.

पात्र उमेदवारांना किती पगार मिळणार?

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22000 रुपयांचा निश्चित स्टायपेंड मिळेल. याशिवाय, उमेदवाराची कामगिरी चांगली असल्यास, त्याला 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त प्रोत्साहन देखील दिले जाईल. म्हणजेच, एकूणच उमेदवाराला 24000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळू शकते. सर्वप्रथम, उमेदवारांचे अर्ज तपासले जातील. त्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाऊ शकते.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, महिला आणि वृद्धांना एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू…MSRTC ST Buses News

तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध

दरम्यान, जे उमेदवार बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना बँकिंग क्षेत्राची आवड आहे, अशा उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवार हे 6 ऑक्टोबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज करु शकतात.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा