Old Pension Scheme Update:सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच केंद्र सरकार मार्फत महत्वपुर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे .
केंद्र सरकार मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसुचना नुसार दि.01.04.2025 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे . सदर नविन नियमानुसार ज्यांची सेवा ही 20 वर्षे पुर्ण झाली आहे , अशांना देखिल पुर्ण पेन्शनचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे.
यापुर्वी सदर सेवा कालावधीची अट ही 25 वर्षे इतकी होती . या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे . युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) ही पेन्शन प्रणाली स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार आहेत .
जसे कि सेवाकाळ दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास पेन्शनची तरतुद तर मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियास कुटुंबनिवृत्तीवेतनाची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय / विकल्प हे दिनांक 30.09.2025 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सेवाकाळाची मर्यादा वाढविल्याने , कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे . यामुळे आता युपीएस पेन्शनचा विकल्प निवडणाऱ्यांची संख्या वाढतील अशी अपेक्षा व्यक्ती करण्यात आली आहे .
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा