Maharashtra government Job 2025 : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती होणार आहे. ‘अनुकंपा’च्या 10 हजार जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे ‘अनुकंपा’ भरतीत नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लकरच याची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या वर्षा अखरेीस सर्व पदे भरली जाणार आहेत.
राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेत दुर्लक्षित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा अनुशेष येत्या १५ सप्टेंबरपर्यंत भरण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध विभागांमध्ये असलेला सुमारे १० हजार जागांचा अनुकंपा तत्त्वावरील अनुशेष या मोहिमेमुळे भरला जाणार आहे. कायदेशीर आणि किचकट सरकारी नियमांमध्ये अडकलेली अनुकंपा भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने
केवळ एका सुटसुटीत आदेशात आणून बसवली आहे. कित्येक वर्षे रखडलेल्या नऊ हजार ६५८ अनुकंपाच्या नियुक्त्या येत्या १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचे विभागाने आदेशच काढले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अनुकंपाची भरती राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे.
‘ड’ वर्गासाठी अट शिथिल
अलिकडच्या काळात ‘ड’ वर्गाच्या जागा बाह्य संस्थांमार्फत कंत्राटी पद्धतीने भरल्या जात असत. त्यामुळे ‘ड’ वर्गाची प्रतीक्षा यादी लांबतच होती. अखेरीस नवीन आदेशानुसार गट ‘क’ साठी सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 20 टक्के, गट ‘ड’साठी दोन वर्षांसाठी २० टक्के मयदिची अट शिथिल करण्यात आली असून रद्द करण्यात आलेली पदे पुनरुज्जीवित करून त्या जागांवर नियुक्त्या देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने नवीन प्रशासकीय सुधारणांची चौकट तयार करण्यासाठी तमिळनाडू, ओडिशा, बिहार आणि गुजरातमध्ये लागू केलेल्या प्रशासकीय सुधारणांचादेखील अभ्यास केला आहे.