Jalgaon Maharashtra State Electricity Distribution Recruitment:Apprentice Act-१९६१ अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदवी / पदवीका धारक (विद्युत) अभियांत्रिकी (शिकाऊ) २०२५-२०२६ या एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांचे अर्ज मागविणे बाबतची जाहिरात
विद्युत वितरण क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या म. रा. वि.वि.क. मर्यादितच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यासाठी Apprentice Act-१९६१ अंतर्गत अभियांत्रिकी पदवी / पदवीका धारक (विद्युत) प्रशिक्षणार्थी (Apprentice Engineer) या संवर्गातील पदवी धारकांसाठी एकुण ६८ व पदवीका धारकांसाठी २९ अशी एकूण ९७ पदे एक वर्ष कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत.
सबब, सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, जे उमेदवार खालील शैक्षणिक अर्हता धारण करीत असतील त्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता नुसार दिनांक ०२.०४.२०२५ व दि. ०३.०४.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते १८.१५ वाजे पर्यंत मुख्य अभियंता म.रा.वि.वि. के. मर्या. विद्युत भवन, जूनी औद्योगीक वसाहत, अजिंठारोह, जळगाव या कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
त्या नंतर आलेले फ़ॉर्म स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी उमेदवारांची निवड ही, पदवी व पदविका यांच्या गुणांच्या मेरीट प्रमाणे करण्यात येईल. अटी व शर्ती-
१. शिकाऊ उमेदवारांची शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे विहीत करण्यात आलेली आहे.
अ. पदवी धारक: बी. ई (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग / टेक्नोलॉजी)
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अभियांत्रीकी पदवी पास
२. संसदेच्या अधिनियमाप्रमाने अधिकृत केलेल्या संस्थेकडून अभियांत्रिकी पट्टी परीक्षा उत्तीर्ण असावेत.
अंतिम पदवी परीक्षेमध्ये किमान ६०% गुण (अ.जाती/अ. जमाती गटासाठी
५५% गुण).
ब. पदविका धारक : डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनियरींग
१. राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ / राज्य परिषद यांस कडून विद्युत अभियांत्रिकी या शाखेची पदवीका परीक्षा उत्तीर्ण,
२. मान्यता प्राप्त विद्यापिठातून विद्युत अभियांत्रिकी या शाखेची पदवीका उत्तीर्ण. अंतिम पदविका परीक्षेमध्ये किमान ६०% गुण (अ.जाती/अ. जमाती गटासाठी ५५% गुण)
२. विद्यावेतन अ) पदवी धारक १०००/- ब) पदविका धारक ८०००
३. प्रशिक्षण कालावधी- एक वर्ष
४. कामाचे ठिकाण जळगांव / धुळे नंदुरबार जिल्हाअंर्तगत कोणत्याही कार्यालय,
५. वयोमर्यादा: सर्व साधारण उमेदवारांसाठी ३० वर्ष मागासवर्गीयांसाठी ३५ वर्ष
६. उमेदवारांनी पदवी / पदवीका धारक (विद्युत) परीक्षा एप्रिल/मे २०२२ व त्या नंतर उत्तीर्ण झालेले अत्सावेत.
७. निवड झालेल्या उमेदवारांची यादी जळगांव परिमंडळ कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल.
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ)जागा
पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -मुख्य अभियंता म.रा.वि.वि. के. मर्या. विद्युत भवन, जूनी औद्योगीक वसाहत, अजिंठारोड, जळगाव.