Government decision issued to pay employees’ dues:घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (आर्थिक वर्ष २०२४-२५)महाराष्ट्र राज्य
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक वेतन-१२२५/प्र.क्र.०७/टीएनटी-३ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन,मुंबई – ४०० ०३२.दिनांक :- २७ मार्च, २०२५
संदर्भ :-१) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे जा.क्र. १८१/अपुमा/२०२४-२५/५५४, दिनांक ३१/०१/२०२५
२) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२४/प्र.क्र. ८०/अर्थ-३, दिनांक १७ मार्च, २०२५
प्रस्तावना :-
राज्यातील जिल्हा परिषद / खाजगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन अदा करणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील जिल्हा परिषद / खाजगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक /शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९ व २२०२०५७६ या लेखाशीर्षातंर्गत ३६ सहायक अनुदाने (वेतन) मधून भागविण्यात येत होता. परंतु सन २०२३-२४ पासून सर्व प्रकारची देयके शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिका तत्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते. त्या अनुषंगाने १० कंत्राटी सेवा अंतर्गत २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९ व २२०२०५७६ या लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीव्दारे वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लेखाशिर्ष २२०२०१७३, २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९ व २२०२०५७६ या लेखाशीर्षातंर्गत १० कत्रांटी सेवा खाली एकूण रु.४१०६०४ हजार (रुपये एक्केचाळीस कोटी सहा लाख चार हजार) इतका निधी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मंजूर व वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.