आनंदाची बातमी कला, क्रीडा व संगणक शिक्षक पदाची भरती ! Maharashtra Teacher Recruitment 2025

Maharashtra Teacher Recruitment 2025:पवित्र पोर्टलमार्फत शासकीय व खासगी आस्थापनामध्ये शिक्षकांची भरती होत असताना आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये कंत्राटी पदभरतीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याच्या धोका टाळण्यासाठी आश्रम शाळेमध्येही शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या शाळेमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयांच्या एकूण १४९७ शिक्षकांची पदे भरण्यात येणार असून यासाठी जवळपास ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्ताने सदर आदेश काढला असून त्यानुसार राज्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा विचार शासन करत असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा

वेळेतच परीक्षा घेऊन नवीन शिक्षकांची निवड करण्यात येणार असल्यामुळे आश्रमशाळांना नव्याने शिक्षक मिळतील.

या प्रक्रियांतर्गत कला, संगणक, क्रीडा शिक्षकांची प्रत्येकी ४९९ म्हणजेच एकूण १४९७ शिक्षकांची भरती होणार आहे

आधुनिक तंत्रज्ञान मिळेल

गेल्या अनेक वर्षे करारावर काम करणाऱ्या कला, क्रीडा, संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली तर विद्यार्थ्यांना नक्कीच व्यावसायिक व आधुनिक तंत्रज्ञान मिळेल.

यामुळे विद्यार्थ्यांचा कलागुणांचा विकास होईल, असा आशावाद पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरग्र यांनी व्यक्त केला.

अधिक माहिती येथे क्लिक करून पहा