MSRTC Recruitment 2025:महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक येथेचे शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार सन २०२५-२६ या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत असून तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागवित आहेत.
शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते १३.०० या वेळेत दिनांक १७.०३.२०२५ पर्यंत मोफत मिळतील.
२. शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी. असे एकुण रु.५९०/-व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु.२५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी. असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडून UTR No. पावती अर्जासोबत जोडाबी, उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही,
१. बँकेचे नाव:-
२. बँकेचा पत्ता:-
३. खातेदाराचे नांवः-
४. खाते क्रमांक-
५. IFSC कोड: –
रा.प. महामंडळाचे बँक खात्याचा तपशील
स्टेट बँक ऑफ इंडिया
जुना आग्रारोड, सिबीएस, मुख्य शाखा, नाशिक
MSRTC फंड A/C
१०९८०२४६६५८
SBIN 0001469
३. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणीत केलेली झेरॉक्स प्रत अर्ज घेतेवेळी सादर करणे आश्यक आहे.
प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
अ) शाळा सोडल्याचा दाखला.
४. उमेदवाराने अर्ज घेतल्या नंतर त्याच दिवशी अर्जातील संपुर्ण माहिती भरुन पुढील दर्शविलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची /
ब) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / गुणपत्रक (गुणपत्रकाची दोन्ही बाजु) यांत्रिक व्यवसायिक व आय. टी. आय. उत्तीर्ण गुणपत्र व प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल एब.एस.सी. (१२ वी) एम.सी.व्ही.सी. (विषय कोड क्र. एम-१, एम-२ / एम-३) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
क) मागासवर्गीय उमेदवाराकरिता विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे अत्यावश्यक आहे.
५. शिकाऊ उमेदवाराची निवड त्यांचे आय.टी.आय. उत्तीर्ण, व्होकेशनल अभ्यासक्रम, व्होकेशनल (इ.१२ वी) संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१, एम-२, एम-३ घेवुन उत्तीर्ण व अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक उत्तीर्ण या गुणांनुसार करण्यात येईल. शैक्षणिक पात्रता दिनांक १७.०३.२०२५ रोजी ०३ वर्षापूवींची नसावी.
६. उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्र कार्यालय / समाजकल्याण कार्यालय / एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ. अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी.
७. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबासाईटवर रजिष्ट्रशेन करून रजिष्ट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीतील पदास Apply करून सदरची प्रिंट अर्जास जोडणे अनिवार्य आहे.
८. शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १७.०३.२०२५ अंतिम राहील. उमेदवाराने अपुर्ण भरलेले व मुक्तीनंतर आलेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
९. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार उमेदवाराने यापुर्वी कोणत्याही संस्थेत / कंपनीत प्रशिक्षण पुर्ण केले असल्यास अर्ज करु नये, त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
१०. उमेदवारांने अलीकडे काढलेला स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिकटवुन सही करणे आवश्यक आहे.
११. शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अन्वये, शिकाऊ उमेदवारी सुधारीत कायदा १९७३ व १९८६ अन्वये करारनामा प्रशिक्षण पुर्ण होण्यापुर्वी लिहुन द्यावा लागेल तसेच प्रशिक्षण सुरु होण्यापुर्वी जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन घेण्यांत मेईल. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शिकाऊ उमेदवारी बोलविण्यात येईल.
भरती जाहिरात येथे क्लिक करून पहा