Vasai Municipal Corporation Recruitment 2025:वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विधी पॅनलवर वकील यांची तीन वर्षांकरीता नव्याने नेमणूक करणेबाबत.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयीन कामकाज करणेकरीता खालीलप्रमाणे मा. न्यायालय/न्यायाधिकरणनिहाय वकील यांची महानगरपालिकेच्या विधी पॅनलवर तीन वर्षाकरीता नव्याने नेमणूक करावयाची आहे.
त्यादृष्टीने इच्छुक वकील/वकील संस्था यांचेकडून वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, मुख्यालय इमारत, ६ वा मजला, यशवंत नगर, म्हाडा संकुलाजवळ, विरार (प), ता. वसई, जि. पालघर, ४०१ ३०३ येथे दि. १५/०३/२०२५ सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता) विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण तपशिल व कागदपत्रांसहित मागविणेत येत आहेत. विलंबाने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची कृपया नोंद घेणेत यावी,
महानगरपालिकेच्या वतीने करावयाचे न्यायालयीन कामकाजासाठी ठरवलेले दर, अटी-शर्ती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या http://vvemc.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक वकील/वकील संस्था यांनी महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेली सदर दरसूची, अटी-शर्ती व अर्जाचा नमुना यांची प्रिंट आऊट काढून सदर अर्ज, दरसूची, अटी-शर्ती मान्य असलेबाबत स्वाक्षरी करुन अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
वकीलांच्या पॅनलच्या नियुक्ती बाबत मा. आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील.
वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा 16
शैक्षणिक पात्रता :१. अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठांचा कायद्याचा पदवीधर असावा.
२. अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा.
३. अभियोक्त्यास १० वर्षापेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.
४. अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
५. अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे
६. अभियोक्त्यास कामगार कायदा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९: महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६: गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तवे (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, १९९४; वैद्यकीय गर्भसमाप्ती अधिनियम, १९७१: बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा, १९४९: भूसंपादन कायदा, बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अॅक्ट, १९९८ः महाराष्ट्र पोलूशन कंट्रोल बोर्ड अॅक्ट, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६; महाराष्ट्र (शहरी भाग) वृक्षांचे सरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५; लवाद व समेट अधिनियम, १९९६: अन्नभेसळ प्रतिबंधक अधिनियम, १९५४; ग्राहक संरक्षण अधिनियम; महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम व महानगर्पलीकेशी संबंधित इतर कायद्याचे व नियमांचे उत्तम ज्ञान व सदर बाबतीत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ मार्च २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय इमारत, विधी विभाग, सहावा मजला, यशवंतनगर, म्हाडा कॉम्प्लेक्स जवळ, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर, पिनकोड- 401303
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा