अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! संपूर्ण कागदपत्रे पहा व ऑनलाईन अर्ज येथे करा.11th Online admission maharashtra 2025

11th Online admission maharashtra 2025:११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ दिनांक १९ मे, २०२५ रोजी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांचेसाठी सराव करणेकरीता पोर्टल सुरु करण्यात आले होते. सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत.

सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे.

यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक १ चे सविस्तर दिनांक १९ मे २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबीच्या दिनांक जाहीर केल्या होत्या. दिनांक २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तांत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इ.११ वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक २२ मे, २०२५ दुपारी ३.०० वाजता फेरी क्रमांक १ बाबतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल.

पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्याध्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल.

कोणतीही छोटयात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोवाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

अधिकृत संकेतस्थळ- https://mahafyjcadmissions.in

ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in

हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा