कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्ती बाबत 02 स्वतंत्र GR निर्गमित.02 GR issued regarding payment of employee salary subsidy and termination of service

02 GR issued regarding payment of employee salary subsidy and termination of service:१)शासन निर्णय:-सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक-एक्स-१ मुख्य लेखाशिर्ष २२३६- पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे माहे मे २०२५ चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-२ मधील लेखाशीर्ष/उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक- ५ प्रमाणे एकुण रु.४९.०० कोटी (रुपये एकोणपन्नास कोटी फक्त) इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२)शासन निर्णय:-परिविक्षाधीन कालावधीत अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, गट अ (एस-२०) यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत…

या विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते, सदर वैद्यकीय अधिकारी यांना शासनाच्या परिविक्षा धोरणातील सर्व तरतुदी लागू आहेत, शासन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या परिवीक्षाधीन कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दि.२९.०२.२०१६ अन्वये तरतूदी विहित करण्यात आल्या आहेत.

त्यामधील अ.क्र.१ (३) (ब) नुसार परिवीक्षाधीन कालावधीत कोणत्याही स्वरुपाची रजा (नैमित्तीकं रजा वगळून) उपभोगल्यास त्याचा परिवीक्षाधीन कालावधी रजेच्या कालावधी एवढा वाढविण्यात यावा.

तसेच (क) नुसार परिवीक्षाधीन कालावधी जास्तीतजास्त एक वर्षांपर्यंत वाढविण्यात यावा. त्यानंतर परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्यात यावा अथवा संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्यात यावी अशी तरतूद आहे.

तसेच परिवीक्षाधीन धोरणाबाबत सामान्य प्रशासन विभाग, शा.नि. दि.२२.६.२०२१ मधील मुद्दा क्र.१० (३) व (४) येथील तरतुदीनुसार परिविक्षाधीन कालावधीत नैमित्तीक रजा वगळून अन्य कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करताना त्याचा परिविक्षा कालावधी रजेच्या कालावधीइतका अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी वाढविण्याची तरतूद आहे. तसेच परिवीक्षाधीन कालावधीत उमेदवार ७ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी समर्थनीय कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास त्याची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे.

या विभागातील अनेक वैद्यकीय अधिकारी हे परिविक्षा कालावधीत एक वषर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आली असल्याने त्यांच्या सेवा समाप्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश :-

प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार परिविक्षा धोरणासंदर्भातील वाचा क्र.१ व २ मध्ये नमूद तरतूदी विचारात घेता, परिविक्षा कालावधीत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या सोबतच्या विवरणपत्रात नमूद वैद्यकीय अधिकारी गट-अ र्याच्या सेवा समाप्त करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ५ स्पष्टीकरणांतर्गत कोणत्या बाबी शिक्षा ठरणार नाहीत याचा उल्लेख केला असून या स्पष्टीकरणातील (आठ) (अ) नुसार परिवीक्षाधीन नियुक्ती केलेल्या शासकीय सेवकाची सेवा, त्याच्या परिवीक्षा काळामध्ये किंवा त्याच्या अखेरीस, त्याच्या नियुक्तीच्या अटीनुसार किंवा अशा परिविक्षेचे नियंत्रण करणारे नियम व आदेश यानुसार समाप्त करणे म्हणजे शिक्षा होत नाही.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०५२११३००३४९८१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल

स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दोन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा